Chandrakant Patil | एसटी कर्मचाऱ्याचं अश्रू पुसणार कोण? नेते रमले राजकीय विश्लेषणात!
Solapur : कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल झाले असून, काहींनी आत्महत्या केल्या आहेत. एकेकाळी सरकारी नोकरीप्रमाणेच एसटीतील नोकरीसाठी तरुणांची झुंबड उडत होती. परंतु, मागील काही वर्षांत या महामंडळाला घरघर लागली असून आता हे महामंडळ बंद पडणार की काय, अशी धास्ती कर्मचाऱ्यांना आहे. त्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोणीतरी त्या आंदोलकांबद्दल माहिती दिल्यानंतर ते त्या ठिकाणी दाखल झाले. पत्रकारांच्या गराडा पाहिल्यानंतर त्यांनी आंदोलकांच्या अश्रूकडे पाठ करीत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवायला सुरवात केल्याचे पाहायला मिळाले. मात्र नेमकं त्यांच्या मागे उभारलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या डोळ्यातील अश्रूंकडे कोणाचेच लक्ष नव्हते.
(व्हिडिओ : विश्वभूषण लिमये)
#chandrakantpatil #solapur